स्वाइन फ्लूने मुंबईकर बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाइन फ्लूने मुंबईकर बेजार
स्वाइन फ्लूने मुंबईकर बेजार

स्वाइन फ्लूने मुंबईकर बेजार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईत दररोज स्वार्इन फ्ल्ययूचे तीन रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे नवीन कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत असताना स्वार्इन फ्ल्यू मात्र वेगाने पसरत असल्याने वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावातून मुंबई सावरत असताना स्वार्इन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा स्वार्इन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये तीन पट वाढ झाली आहे. गतवर्षी जुलै महिन्यात स्वार्इन फ्ल्यूचे २१ रुग्ण आढळले होते; तर या वर्षी आतापर्यंत स्वार्इन फ्ल्यूचे ६२ रुग्ण आढळून आले आहेत.

डेंगी-गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबईत डेंगी आणि गॅस्ट्रोचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या २४ दिवसांत डेंग्यूगीचे ५०; तर गॅस्ट्रोचे ५२४ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलैमधील डेंगी आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. सध्या मुंबईत डेंगीचे दररोज दोन रुग्ण आढळत आहेत; तर गॅस्ट्रोमुळे दररोज २२ जण आजारी पडत आहेत.

आजार २०२१ २०२२ (२४ जुलैपर्यंत)
मलेरिया ७७६ ३९७
लेप्टो ३७ ३४
डेंगी २८ ५०
गॅस्ट्रो २९४ ५२४
हेपॅटायटिस ४७ ५५
चिकुनगुनिया ० १
स्वार्इन फ्ल्यू २१ ६२
----------
स्वार्इन फ्ल्यूबाबत लोकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत लोकांनी गर्दी टाळावी. तसेच शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड रुमालाने झाकले पाहिजे. याशिवाय तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास असल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90366 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..