अतिप्रसंग करणाऱ्याला १५ दिवसांत बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिप्रसंग करणाऱ्याला १५ दिवसांत बेड्या
अतिप्रसंग करणाऱ्याला १५ दिवसांत बेड्या

अतिप्रसंग करणाऱ्याला १५ दिवसांत बेड्या

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : लोअर परेल रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार करून अतिप्रसंग करणाऱ्याला मंगळवारी चर्चगेट परिसरामधून अटक केली आहे. १० जुलै रोजी हा प्रकार घडल्यानंतर १५ दिवसांत आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
हरीश कुमार गुप्ता असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरामध्ये काही कारणावरून वाद झाल्याने पीडित १४ वर्षीय मुलगी घर सोडून लोअर परळ स्टेशन परिसरात आली होती. या वेळी मुलीला एकटी बघून हरीश गुप्ताने तिच्याशी ओळख केली. त्यानंतर स्टेशन परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करत ब्लेडने वार केले होते. हा प्रकार पीडितेने घरच्यांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र घटना रेल्वे हद्दीत घडल्याने हा गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई रेल्वे गुन्हे शाखेने विविध टीम बनवून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी हरिश कुमार गुप्ता चर्चगेट परिसरात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चर्चगेट परिसरातून आरोपीला अटक केली. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही चोरी, मारामारीचे विविध गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90368 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top