
जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
खारघर, ता. २६ (बातमीदार) : खारघर सेक्टर १८ जलकुंभाशेजारील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. ही बाब राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश रांजवन यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती सिडकोच्या पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. खारघरमध्ये नेहमी पाणीटंचाईची समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली.
सुरेश रांजवन यांनी सांगितले, की जलकुंभालगत जलवाहिनी फुटून जवळपास तासभर पाणी वाहत होते. या पाण्यामुळे सेक्टर १८ मधील रस्ते जलमय झाले होते. सिडको अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ३० ते ४० मिनिटांतर ते घटनास्थळी दाखल झाले. जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळे सेक्टर १५ ते १८ परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे रांजवन तसेच येथील नागरिकांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90386 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..