मंकीपॉक्‍सबाबत आरोग्‍य विभाग सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंकीपॉक्‍सबाबत आरोग्‍य विभाग सतर्क
मंकीपॉक्‍सबाबत आरोग्‍य विभाग सतर्क

मंकीपॉक्‍सबाबत आरोग्‍य विभाग सतर्क

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : कोरोनानंतर आता मंकी पॉक्सचे रुग्‍ण आढळू लागल्‍याने सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्‍या आहेत. या आजारात सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कांजण्या, गोवर किंवा देवीसारखी अंगावर पुरळ येतात. रायगडमध्ये ६०-७० च्या दशकात अशी लक्षणे असलेले रुग्‍ण आढळले आहेत. त्यामुळे मंकी पॉक्सबद्दल सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे. जिल्हा आरोग्य विभागाने मात्र मंकी पॉक्सबद्दल भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मंकी पॉक्‍सची लक्षणे देवीच्या रोगासारखीच आहेत. बाधा झाल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी ६ ते १३ दिवसांचा असतो. काही रुग्णांमध्ये हा ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. जिल्हा वैद्यकीय अधिकारी गजानन गुंजकर यांच्या म्हणण्यानुसार, या काळात रुग्‍णामार्फत आजाराचा प्रसार होत नाही. बाधित व्यक्तीला लागण झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये संक्रमण दिसून येते.
पहिल्या टप्प्यात ताप, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, पाठदुखी, स्नायू आणि अंगदुखी, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. यात अंगावर पुरळ येणे हे आजाराचे प्रमुख लक्षण आहे. पुरळ येण्याच्या एक ते दोन दिवस आधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात दोन ते तीन तास राहिल्यानंतर आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यांत ताप येऊन सर्वांगावर पुरळ येतात. सर्वात जास्‍त पुरळ चेहऱ्यावर येतात. अशीच लक्षणे कांजण्या, गोवर या आजारांची असून दरवर्षी रायगड जिल्ह्यात या आजाराचे रुग्‍ण आढळतात.

देवी हा आजार आता आढळत नसला तरी कांजण्या-गोवर यांसारखे साथीचे आजार आजही ग्रामीण भागात दिसून येतो. साधारण ६०- ७० च्या दशकात अंगावर पुरळ येण्यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त होते. आता नव्याने आलेल्‍या मंकी पॉक्सची लक्षणेही तशीच आहेत. त्‍यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- शांताराम पाटील, वडखळ

बाधित व्यक्तीच्या संपर्कात दोन ते तीन तास आल्यानंतर मंकी पॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. महाराष्‍ट्रात अद्याप मंकी पॉक्‍सचा एकही रुग्‍ण आढळला नसला तरी आरोग्‍य विभागाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे.
- गजानन गुंजकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90408 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top