
९० फुटी रस्ता कधी मोकळा श्वास घेणार
धारावीतील ९० फुटी रस्ता
वाहतूक कोंडीच्या विळख्यात
धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत रस्त्यांपैकी एक असलेल्या ९० फुटी कृष्णन मेनन मार्गावर कामराज शाळेसमोरील भूमिगत कामासाठी पालिकेने खोदकाम सुरू केले होते. मात्र, काम पूर्ण झाले तरीही अद्याप रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही. कामाच्या ठिकाणी पत्रे लावून ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत असून वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. पालिकेने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मुंबई शहर व उपनगरांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून ९० फुटी रस्ता ओळखला जातो. सायन, केईएम, वाडिया आदी रुग्णालयांत जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने त्यावरून सतत रुग्णवाहिका धावत असतात. समोरच कामराज शाळा आहे. शाळा भरताना व सुटल्यावर विद्यार्थी-पालकांची गर्दी होते. खोदकामामुळे रस्त्यावर गर्दी होते. त्यातच वाहतूक कोंडीची भर पडते. धारावी हिंदू स्मशानभूमीत जाण्यासाठी हाच रस्ता ओलांडून अंत्ययात्रा न्यावी लागते. गर्दीमुळे अनेकदा अंत्ययात्रा थांबवावी लागते. सायन रुग्णालय आणि माटुंगा स्थानकात जाण्यासाठी इथे असलेल्या बेकायदा टॅक्सी थांब्यामुळे अडचण होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90442 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..