वसई-विरारमध्‍ये बूस्टरचे दीड लाख लाभार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona booster dose
वसई-विरारमध्‍ये बूस्टरचे दीड लाख लाभार्थी

वसई-विरारमध्‍ये बूस्टरचे दीड लाख लाभार्थी

वसई - वसई-विरार शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या बूस्टरसाठी आवाहन केले जात असून आतापर्यंत १ लाख ६० हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. एकूण १४ लाख सहा हजार ८०३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. केवळ ११६ बाधित असून, ते सध्‍या उपचार घेत आहेत. पूर्वी महापालिकेने दिव्यांगांसह घरोघरी, झोपडपट्टी भाग, दुर्गम व ग्रामीण भागात जाऊन लसीकरण केले होते. यावेळी नागरिकांना लसीकरण केंद्रात रांगेत उभे राहण्याची वाट पाहावी लागली नाही व ताबडतोब डोस प्राप्त झाला होता. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. सध्याही महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू ठेवले असून, विविध केंद्रांत नागरिकांना लाभ मिळत आहे.

हेल्थवर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ज्‍येष्ठ नागरिक व युवक अशा वर्गीकरणात डोस देण्यात येत आहेत. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम हाती घेतानाच लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. ज्यांना दुसरा डोस घेऊन २८ आठवडे पूर्ण झाले आहेत, अशांना कोव्‍हिशील्ड व कोव्हॅक्सिनचा बूस्टर देण्यात येत आहे. महापालिकेकडे पुरेसे डोस उपलब्ध असल्याने नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अशातच पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण १५ लाखांवर आहे; परंतु बूस्टरला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे नागरिकांनी बूस्‍टर डोस घेण्‍यासाठी पुढे यावे यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे.

लसीकरण झालेले लाभार्थी
पहिला डोस - १५ लाख २७ हजार ३९३
दुसरा डोस - १४ हजार ८०३
बूस्टर - १लाख ६० हजार १३४

वसई-विरार शहरात लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यानुसार लसीकरण केले जाते. बूस्टर घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी पुढे यावे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90451 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top