दोन दिवसांत मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खड्डे भरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांत मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खड्डे भरा
दोन दिवसांत मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खड्डे भरा

दोन दिवसांत मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खड्डे भरा

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दोन दिवसांत भरा, असे आदेश खासदार राजेंद्र गावित यांनी दिले आहेत. खासदार गावित यांनी नुकतीच या संदर्भात पालघर येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. या वेळी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे सूरज सिंग, राहुल जालन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता हेमंत भोईर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी खासदारांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. तसेच खासदारांनी स्वतः घोडबंदर ते तलासरी या रस्त्याची पाहणी केली. या दरम्‍यान महामार्गावर खड्डे असतानाही खानिवडे व चारोटी येथे टोल वसूल केला जात आहे, हा वाहनचालकांवर अन्याय असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. तसेच दोन दिवसांत खड्डे न भरल्यास हा विषय लोकसभेपर्यंत न्यावा लागेल, अशी समज संबंधित अधिकाऱ्यांना दिली. सोबतच देखभाल दुरुस्ती करणारी कंपनी, टोल वसूल करणारी कंपनी व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यात ताळमेळ नसल्याचे अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले.

खासदारांच्‍या सूचना
नवीन चार रुग्‍णवाहिकांची सोय करावी, वाहनांचा अपघात झाल्यास किंवा वाहन बंद पडल्यास त्‍यांना हटवण्यासाठी ३० टनापेक्षा जास्त क्षमता असलेले हायड्रा टोईंग वाहनाची सोय करावी, मध्यवर्ती ठिकाणी फायर ब्रिगेडची सोय करावी, विक्रमगड जव्हारला जाणारा मनोर येथील फाटा येथे उड्डाणपूल बांधावा, दुर्वेश येथील उड्डाण पुलाची उंची वाढवावी, चारोटीच्‍या पुलावरील वळण नीट करावे, मेंढवण खिंडीतील उतारीचे वळण काढून तेथे सरळ रस्ता करावा, अशा अनेक सूचना खासदार राजेंद्र गावित यांनी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90460 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..