ठाण्‍यात ५४ दिवसांत कोरोनाचे ३० बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्‍यात ५४ दिवसांत कोरोनाचे ३० बळी
ठाण्‍यात ५४ दिवसांत कोरोनाचे ३० बळी

ठाण्‍यात ५४ दिवसांत कोरोनाचे ३० बळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पूर्णतः संपला नसल्याचे दिसून येत आहे. मागील ५४ दिवसांत जिल्ह्यात २३,३९५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून ३० जणांचा कोरोनाने बळी घेतला असल्याची धक्‍कादायक माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे तज्‍ज्ञांकडून सांगितले जात आहे.

मागील अडीच वर्षांपासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्णांची संख्या बघता बघता हजारोंच्या घरात पोहोचली. आजार नवीन असल्याने सुरुवातीला डॉक्टरांनाही उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. दीर्घकाळ डॉक्टर व इतर कर्मचारी या आजाराशी अहोरात्र लढा देत होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून टाळेबंदीही करण्यात आल्याने, काही अंशी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. दरम्‍यान, मागील ५४ दिवसांत ३० जणांचा कोरोनाने बळी घेतला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना अजून गेलेला नसून त्याला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
गंभीर बाब
ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या आत आला असून बळींची संख्‍याही शून्यावर आली आहे. १ जून ते २४ जुलै २०२२ या ५४ दिवसांच्या कालावधीत ५ लाख ८८ हजार ३२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यामध्ये २३ हजार ३९५ बाधित रुग्ण आढळून आले. ५ लाख ६३ हजार ८६१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी या आजाराने ३० जणांचा बळी गेला असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90476 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..