व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग
व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग

व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : व्हिडीओ कॉल करून त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार विरार येथे उघडकीस आला. येथील सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्याबाबत हा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांनी सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार दाखल केली. क्राईम ब्रँचकडून याचा तपास सुरू आहे.

मुनाफ बलोच यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. यात एक महिला अर्धनग्न अवस्थेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे बलोच यांनी फोन कट केला; पण थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून एक व्हिडीओ पाठवण्यात आला. यात मुनाफ बलोच यांचा चेहरा एका नग्न पुरुषाच्या शरीरावर ब्रज करण्यात आला होता. हा स्क्रीन शॉट व्हायरल करण्याची धमकी देत त्या बदल्यात सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. बलोच यांनी वेळीच खबरदारी घेत विरार पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली. तसेच, मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील सायबर क्राईम ब्रँचलाही याची तक्रार दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90504 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..