कोपरीत उद्धव ठाकरेंचे शुभेच्छा बॅनर उतरविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरीत उद्धव ठाकरेंचे शुभेच्छा बॅनर उतरविले
कोपरीत उद्धव ठाकरेंचे शुभेच्छा बॅनर उतरविले

कोपरीत उद्धव ठाकरेंचे शुभेच्छा बॅनर उतरविले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे कोपरीत बॅनर लावण्यात आले होते. मात्र, बुधवारी महापालिका आयुक्तांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर उतरविण्यात आल्याने ठाकरे समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दर वर्षी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरी आणि कळव्यातील विविध भागात ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात येतात. बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी येथील कोपरी विसर्जन घाटाचा पाहणी दौरा केला. या वेळी त्यांच्या निदर्शनास हे बॅनर येताच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागानेदेखील या बॅनरवर कारवाई केली. दुसरीकडे या कारवाईनंतर बॅनर काढायचे होते, तर सर्वांचे काढणे अपेक्षित होते. शहरात काही गोष्टी चालतात, काही गोष्टी चालत नाहीत. अशी तत्परता यापुढेही दाखवावी, एवढीच अपेक्षा असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी केदार दिघे यांनी सांगितले. मात्र, ही नियमित कारवाई असल्याची माहिती देत, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढता पाय घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90510 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..