उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर ऑर्थर तुरुंगात हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील
आरोपीवर ऑर्थर तुरुंगात हल्ला
उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर ऑर्थर तुरुंगात हल्ला

उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर ऑर्थर तुरुंगात हल्ला

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर ऑर्थर रोड कारागृहात प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता.२७) घडली. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूख पठाण असे हल्ला झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नूपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी अमरावती येथे हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सात आरोपींना अटक केली असून सर्व आरोपी ऑर्थर रोड कारागृहात आहेत. दरम्यान, कारागृहातील कैद्यांमध्ये कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली, यावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी शाहरूख पठाणने नूपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक झाल्याचे सांगितले. त्यावेळी इतर कैदी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण आवण आणि संदीप जाधव यांनी पठाणवर हल्ला केला. कारागृह प्रशासनाने तात्काळ त्यांना एकमेकांपासून दूर केले आणि वेगवेगळ्या बराकीत हलवले. दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात शाहरूखशिवाय शेख इरफान, मुदस्सीर अहमद, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद आणि युसूफ खान यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90516 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top