डोंबिवलीत विकसकाकडून ग्राहकांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत विकसकाकडून ग्राहकांची फसवणूक
डोंबिवलीत विकसकाकडून ग्राहकांची फसवणूक

डोंबिवलीत विकसकाकडून ग्राहकांची फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः खोटी माहिती देत विकसकांनी ग्राहकांकडून ७ लाख ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील साई ऑर्किड इमारतीमधील सदनिका विक्री करण्याचे करारनामे केले असल्याची खोटी माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदनिका न देता पैसेही परत न केल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी विकसकांविरोधात मानमाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील हिंदळेकर हे डोंबिवलीतील सागाव येथील रहिवासी आहेत. विकसक अनिल सिंग व नीरज सिंग यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दावडी येथील साई आर्किडमधील घर विक्री करण्याचे करारनामे त्यांच्या फर्मने तयार केले असल्याचे विकसकांनी सांगितले. तसेच, सुशील, त्यांचा भाऊ सत्यवान व त्यांच्या परिचित वैशाली पटने यांच्याकडून घर खरेदी करण्यासाठी टोकन म्हणून स्टॅम्प ड्युटीकरिता ७ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन तसेच रोखीने घेतले, अशी तक्रार सुशील यांनी केली आहे. गेल्या वर्षभरात सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी या तिघांनी विकसक सिंग यांच्याकडे तगादा लावला. सदनिका मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. त्याकडे विकसकाने दुर्लक्ष केले असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हिंदळेकर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत विकसकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90529 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..