दडपशाहीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दडपशाहीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर
दडपशाहीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर

दडपशाहीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर

sakal_logo
By

वडाळा, ता. २७ (बातमीदार) ः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीमार्फत चौकशीला बोलावण्यात आले. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून मोदी सरकारच्या या दडपशाही व सुडाच्या राजकारणाविरोधात बुधवारी (ता. २७) दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने सायन कोळीवाडा येथील निषेध आंदोलन करण्यात आले. यात मोदी सरकार विरोधात आंदोनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलनकर्त्यांना अँटॉप हिल पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता, कार्याध्यक्ष कचरू यादव, माजी नगरसेविका पुष्पा कोळी, काँग्रेस कमिटी महासचिव अमित शेट्टी आदी काँग्रेस नेते, मुंबई काँग्रेस पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी सहभागी झाले होते.
----
बोरिवली स्थानकात ''रेल रोको''
मुंबई, ता. २७ : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनियांना गांधी यांच्यावर होत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीविरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्थानकांत ''रेल रोको'' आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबईहून पोरबंदरला जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसला काही मिनिटे उशीर झाला. रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेत रेल्वेमार्ग मोकळा केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90543 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..