
पहाटेची किन्हवली-आसनगाव बस सुरू
किन्हवली, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दीर्घकाळ चाललेल्या संपात बंद झालेली किन्हवली-आसनगाव ही पहाटेची बस चालू करावी, अशी मागणी युवा सेनेने शहापूर आगारप्रमुखांकडे केली होती.
किन्हवलीहून मुंबई व ठाणे आदी शहरात नोकरी-धंद्यानिमीत्त जाणारे चाकरमानी व शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांना सोयीची असणारी किन्हवली ते आसनगाव रेल्वेस्थानक अशी पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी सुटणारी बस संप काळात बंद झाल्याने ती सुरू व्हावी, अशी मागणी किन्हवली येथील युवासैनिक ऋषिकेश धानके यांनी शहापूर आगार प्रमुख यांच्याकडे केली होती. मध्य रेल्वेच्या आसनगाव या स्थानकावरून लोकल ट्रेनने किन्हवली भागातून शेकडो चाकरमानी, विद्यार्थी प्रवास करत असतात. कार्यालयीन वेळेत पोहचण्यासाठी किन्हवली येथून वेळेवर सुटणारी पहाटेची बस सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. ही बस पूर्ववत सुरू व्हावी यासाठी किन्हवली येथील युवासैनिक ऋषिकेश धानके यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी शहापूर तालूका युवा सेना पदाधिकाऱ्यांसह शहापूर आगारप्रमुख यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90564 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..