ओंदे-नालीपाडा रस्तावरील पुलाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंदे-नालीपाडा रस्तावरील पुलाची दुरवस्था
ओंदे-नालीपाडा रस्तावरील पुलाची दुरवस्था

ओंदे-नालीपाडा रस्तावरील पुलाची दुरवस्था

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते, साकाव, पूल पाण्याखाली होते. या पावसाच्या पाण्यामुळे औंदे-नालीपाडा या जोड रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे या पुलाची दुरवस्‍था झाली असून प्रशासनाने तत्‍काळ हा पूल दुरुस्‍त करावा, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.
या पुलाच्‍या दुरवस्‍थेमुळे येथून वाहन नेणे धोकादायक झाले आहे. या पुलावर याआधी दोन वेळा दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. मात्र दरवर्षी या पुलाची दुरवस्था होत असते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यातील अशा अनेक धोकादायक रस्ते, साकाव, पुलांचा सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करणे गरजेचे असल्‍याचे मत व्‍यक्‍त होत आहे.

पावसामुळे औंदे-नालीपाडा रस्त्यावरील पुलाची दुरवस्‍था झाली आहे. हा पूल लवकरात लवकर दुरुस्‍त होणे गरजेचे आहे, अन्‍यथा या मार्गावरून वाहन नेत असताना अपघात होण्याची शक्‍यता आहे.
- विश्वनाथ माळी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90567 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..