अवैध वाहतुकीविरोधात बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाहतुकीविरोधात बडगा
अवैध वाहतुकीविरोधात बडगा

अवैध वाहतुकीविरोधात बडगा

sakal_logo
By

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : शालेय विद्यार्थी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४० स्कूलबसवर वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने कारवाई केल्या आहेत. त्यांना ७० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

शहरात १,५०० स्कूल बस असून अनेकांनी पासिंग केलेले नाही, तर काहींनी गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र घेतलेले नाही. शहरात मंगळवारी (ता. २६) ते १ ऑगस्टपर्यंत स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. चिमुकल्यांची जीवघेणी वाहतूक थांबण्यासाठी स्कूल बसची तपासणी सुरू आहे. वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून तीन दिवसांत विविध भागात कारवाई करण्यात आली. शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे वाशी आरटीओकडून फिटनेस आणि परमिटसाठी स्कूल बसची तपासणी सुरू केली आहे. नियमांचे पालन न करता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर कारवाई करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबईतही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बससाठी नियम घालून देण्यात आले आहेत. यामध्ये बसचे योग्यता प्रमाणपत्र, बसमधील आसनव्यवस्था आदींबाबत अनेक तरतुदी आहेत. मात्र, सद्यस्थितीत नियमभंग करून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. सदरची मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मोटार निरीक्षक प्रशांत शिंदे, रश्मी पगार, अजिंक्य गायकवाड, अविनाश मराठे, किरण लचुरे या परिवहन पथकाचा समावेश आहे.

अवैधरीत्या वाहतूक सुरू
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसशिवाय इतर वाहनांमधून अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयांकडून सात दिवस तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सदरची स्कूल बस तपासणी मोहीम सात दिवस सुरू राहणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर व इतर त्रुटी असणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. सोमवारपर्यंत तपासणी मोहीम सुरू असेल. तसेच त्यानंतरही आमच्या पथकाकडून तपासणी केली जाईल.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

बसमधील आवश्‍यक बाबी -
आपत्कालीन दरवाजा असावा.
क्षमतेप्रमाणेच आवश्‍यक विद्यार्थी असावेत.
स्कूल बसमध्ये प्रथमोपचाराची सोय असावी.
अग्निशमन यंत्रे व दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र सोय असावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90612 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..