शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेना उपनेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेना उपनेतेपद
शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेना उपनेतेपद

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेना उपनेतेपद

sakal_logo
By

शिवसेनेत प्रवेश करताच
सुषमा अंधारेंना उपनेतेपद
१५ ऑगस्टपासून राज्यभराचा दौरा करणार
मुंबादेवी, ता. २८ (बातमीदार) : आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत आज शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना पक्षाचे उपनेतेपद बहाल करण्यात आले. अंधारे यांनी १५ ऑगस्टपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा संघटनाबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांच्या सभा घेत आहेत. आदित्य ठाकरे निष्ठायात्रांनंतर आता राज्यभरात संवादयात्रा काढत आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहेत. अशा वेळी सुषमा अंधारे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते.
अंधारे यांनी मनगटात शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरे यांनी तुमच्याकडे मोठी जबाबदारी सोपवत आहे, असे सांगत त्यांना उपनेतेपद बहाल केले. भावूक झालेल्या अंधारे यांनी भाजपला इशारा दिला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो आहोत, असे त्या म्हणाल्या.

मी खरी पदे वाटतो!
उद्धव ठाकरे म्हणाले, की आता काही जण नसलेल्या शिवसेनेची पदे वाटत आहेत. मी आपल्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचे पद वाटत आहे. आता दोन लढाया सुरू आहेत. एक म्हणजे कायद्याची आणि दुसरी जनतेची. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्यातून असामान्य लोक तयार केले. आता पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळी आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90636 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..