ऑलेक्ट्राच्या तिमाही नफ्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलेक्ट्राच्या तिमाही नफ्यात वाढ
ऑलेक्ट्राच्या तिमाही नफ्यात वाढ

ऑलेक्ट्राच्या तिमाही नफ्यात वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत ३०४.७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ४१.२ कोटी रुपये होता. त्यामुळे कंपनीच्या महसुलात ६४० टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

या तिमाहीत १६९ इलेक्ट्रिक बसेसच्या मागणीची पूर्तता करण्यात आली. मागच्या वर्षीच्या तिमाहीत फक्त ११ बसेसची डिलिव्हरी होऊ शकली होती. चालू तिमाहीत कंपनीच्या पुणे बस संचालनातून उत्तम उत्पन्नाची नोंद झाली आहे. करानंतरचा नफा ८२५.२ टक्क्यांनी वार्षिकी आधारावर वाढून १८.८ कोटी झाला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत फक्त २.० कोटी रुपये होता. करपूर्व नफा ७९९.९ टक्क्यांनी वाढून २४.७ कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने १८.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90658 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..