शिवाजी शिक्षण संस्थेत सामूहिक दीप पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी शिक्षण संस्थेत सामूहिक दीप पूजन
शिवाजी शिक्षण संस्थेत सामूहिक दीप पूजन

शिवाजी शिक्षण संस्थेत सामूहिक दीप पूजन

sakal_logo
By

शिवाजी शिक्षण संस्थेत
सामूहिक दीपपूजन

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः घाटकोपरमधील ६० वर्षे ओलांडलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेत अनेक वर्षांपासून आषाढी अमावास्येला विद्यार्थ्यांकडून सामूहिक दीपपूजन केले जाते. आजही दीपपूजनाचा नेत्रदीपक सोहळा पार पडला. सकाळ आणि दुपारच्या सत्रात मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची साधारण एक हजार २०० मुले गटागटाने कार्यक्रमात सहभागी झाली होती.

शिवाजी शिक्षण संस्था ६२ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, पदवीपर्यंत तब्बल साडेपाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज सायंकाळी ५ वाजता आषाढ अमावास्येनिमित्त शाळेत संस्थेतर्फे दीपपूजन करण्यात आले. २००८ पासून शाळेत दीपपूजन होत आहे. आजही विविध आकारांच्या आणि धातूच्या पणत्यांत दिवे पेटवण्यात आले होते. त्यात माती, चिनी माती, दगड आणि धातूच्या दिव्यांचा समावेश होता. विजेवर चालणारे दिव्याचे प्रकारही पूजास्थानी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्गावर्गाच्या गटाने येऊन दिव्यांची पूजा केली. प्रार्थना सादर केली. विद्यार्थ्यांना सणाची महती सांगून दिव्यांच्या विविध प्रकारांची माहिती देण्यात आली. वीज कशी वाचवावी याची माहितीही त्यांना देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90666 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..