मरीन लाईन्सवरील टेट्रापॉड पुन्हा जागेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मरीन लाईन्सवरील टेट्रापॉड पुन्हा जागेवर
मरीन लाईन्सवरील टेट्रापॉड पुन्हा जागेवर

मरीन लाईन्सवरील टेट्रापॉड पुन्हा जागेवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पालगतच्या परिसरात नागरिकांना काही दिवसांपूर्वी कंपने जाणवली होती. त्यामुळे दोन इमारतींमधील रहिवाशांनी या कंपनाबाबतची तक्रार मुंबई महापालिकेकडे केली होती. मरीन लाइन्सलगतचे काँक्रीटचे टेट्रापॉड हटवल्याने ही कंपने जाणवली असावीत, अशी नागरिकांची तक्रार होती. त्यानंतर पालिकेने हे टेट्रापॉड कंत्राटदारांना पुन्हा मूळ ठिकाणी लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे टेट्रापॉड पुन्हा जैसे थे ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही सातत्याने या परिसरात कंपनांबाबतची माहिती गोळा करत आहोत. नागरिकांच्या तक्रारीनुसार काही सेकंदासाठी ही कंपने जाणवली होती, परंतु आम्ही दिलेल्या भेटीदरम्यान कोणतीही कंपने जाणवली नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आगामी काळातही काही दिवस कंपनांवर लक्ष ठेवणार आहोत. तसेच नागरिकांच्या तक्रारीनुसार तीन दिवसांपूर्वीच हे टेट्रापॉड त्यांच्या मूळ ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
---
कोणताही परिणाम नाही!
कोस्टल रोड प्रकल्पाच्या ठिकाणी कंपने तपासण्याठी लावलेल्या उपकरणात अगदी एरवी उपलब्ध होणारी सरासरी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे कोणताही वेगळा असा समुद्राच्या लाटांचा परिणाम आढळला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. १९९८ ते २००४ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काँक्रीटचे टेट्रापॉड मरीन लाइन्सच्या परिसरात ठेवण्यात आले होते, परंतु कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात हे टेट्रापॉड या ठिकाणाहून हलवण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90669 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..