ठाण्यातील विकासकामांची झाडाझडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील विकासकामांची झाडाझडती
ठाण्यातील विकासकामांची झाडाझडती

ठाण्यातील विकासकामांची झाडाझडती

sakal_logo
By

रस्ते प्रकल्प, बसपोर्ट, सरकारी कार्यालय पुनर्बांधणी (शोल्डर)
- मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेले विविध रस्ते प्रकल्प यांसह ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कळवा येथील बसपोर्ट आणि ठाण्यातील सरकारी कार्यालयांच्या पुनर्बांधणीच्या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाडाझडती घेतली. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सर्व विकासकामांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले.
ठाणे जिल्ह्यातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतल्या. या वेळी कळवा येथील राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाचे विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापनाच्या जागेत अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे असे निर्देशही दिले. या बसपोर्टमध्ये बस गाड्या दुरुस्तीसाठी गाळे, भांडार विभाग, वॉशिंग रॅम, वाचमन केबिन, स्क्रॅपयार्ड, दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या उभ्या करण्यासाठीच्या जागेसह आवश्यक सोयी-सुविधांचा नव्याने आराखडा सादर करावा. तसेच ठाणे रेल्वे स्टेशनलगतच्या जागेवर एस.टी. डेपोसह सार्वजनिक पार्किंग, वाणिज्य वापराचे बांधकाम, चालक-वाहक विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, प्रवासी उतरण्यासाठी स्वतंत्र सोय, कार्यालय आस्थापनांचा समावेश करून सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

हे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर
- भिवंडी- कल्याण- डोंबिवली- उल्हासनगर या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वसई-विरार मल्टिमोडल कॉरिडॉर.
- आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बांधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग.
- शिळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प.
- विश्वभारती फाटा- भिनार- वडपा मार्गाचे काम मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाला सोपवण्याच्या सूचना.
- शिळफाटा-भिवंडी रस्त्याचा मोबदला मार्गी लागणार.

क्लस्टरसाठी आयटीआयची जागा
ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरिता वर्ग करण्यासाठी ठाणे महापालिकेने कौशल्य विकास विभागाशी चर्चा करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आयटीआय परिसरातील धोकादायक झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90674 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..