ब्रेन ट्युमरवर २२ वर्षीय युवतीची मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेन ट्युमरवर २२ वर्षीय युवतीची मात
ब्रेन ट्युमरवर २२ वर्षीय युवतीची मात

ब्रेन ट्युमरवर २२ वर्षीय युवतीची मात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ ः नाशिकच्या एका २२ वर्षीय नृत्य करणाऱ्या युवतीच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तिला जीवदान मिळाले आहे. या शस्त्रक्रियेत फार गुंतागुंत आणि जोखीम होती. १५ सेंटिमीटर ब्रेन ट्यूमरच्या क्रॅनिओटॉमीनंतर (कवटीच्या आतील दाब कमी करणे) या युवतीला जीवदान मिळाले आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रक्त संक्रमण आणि १ महिन्याच्या व्हेंटिलेटर सपोर्टनंतर ही युवती आता सामान्य जीवन जगू लागली आहे.
२२ वर्षीय अर्चना ही नृत्यांगना आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. तिला डोकेदुखी आणि चक्कर येत होती, त्यावर औषधोपचारही सुरू होते. अर्चना एका कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध पडली असता तिला रुग्णालयात नेण्यात आले. ब्रेन इमॅजिंग केल्यानंतर मेंदूच्या मध्यवर्ती भागात प्रचंड मोठा ट्यूमर दिसून आला. तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांव्यतिरिक्त दृष्टीची समस्या व चालण्यातही तिला अडचण येऊ लागली. ट्यूमरच्या जटिलतेमुळे सर्व स्थानिक रुग्णालयांनी कोणतीही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिला एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची शस्त्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक गुंतागुंतीची झाली.
ट्यूमरला रक्तपुरवठा अधिक होत असल्याने रक्त कमी झाले होते. तिच्या मेंदूला सूज आली आणि रक्तस्रावही झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी कमी वेळेत शस्त्रक्रिया होईल, असा मार्ग निवडला. न्यूरोसर्जन डॉ. विवेक अग्रवाल यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. आता ही युवती पूर्णपणे ठीक असून सामान्य जीवन जगत आहे.

...असे केले उपचार
मेंदूतील दाब कमी करण्यासाठी युवतीच्या कवटीचे हाड एका महिन्यासाठी रेफ्रिजमध्ये काढून ठेवले आणि जतन केले. एका महिन्याच्या व्हेंटिलेटर आणि रक्त संक्रमणानंतर तिला एका बाजूला अर्धांगवायू असताना पुन्हा शुद्ध आली. तिच्या अशक्तपणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि तिची प्रकृती सुधारू लागली. त्यानंतर ते हाड तिच्या कवटीत पुन्हा बसवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90679 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..