कर्करोग पिडितांना आर्थिक पाठबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोग पिडितांना आर्थिक पाठबळ
कर्करोग पिडितांना आर्थिक पाठबळ

कर्करोग पिडितांना आर्थिक पाठबळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः कर्करोगावरील उपचार परवडणारे नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. अशा पीडितांना ‘कँसर एड अँड रिसर्च फाऊंडेशन’ने मदतीचा आधार दिला आहे. भायखळा येथे झालेल्या एका कार्यक्रमात १५ कर्करुग्णांना किमोथेरपीसाठी लागणारा आर्थिक खर्च म्हणून ७ लाखांपर्यंतची आर्थिक मदत; तर इतर आजारांच्या रुग्णांसाठी रेशन किट्सचेही वाटप केले.
कर्करुग्णांना अनेकदा किमोथेरपी घ्यावी लागते. प्रत्येक वेळच्या किमोथेरपीला किमान २५ ते ३० हजार मोजावे लागतात. त्यानुसार, प्रत्येक वेळच्या किमोथरेपीसाठी या रुग्णांना आर्थिक मदतीची गरज असते. अशा १५ रुग्णांना आर्थिक आणि औषधांची मदत संस्थेतर्फे करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता आणि कॉरिओग्राफर जावेद जाफरी उपस्थित होते. या माध्यमातून रुग्णांना, आर्थिक, सामाजिक, रेल्वेचा खर्च आणि इतर औषधांसाठी लागणारा खर्च दिला जाणार आहे. तसेच ‘मिशन सहाय’ या प्रकल्पातून धर्मशाळेत राहणाऱ्या कर्करोगपीडितांच्या जेवणाचाही खर्च केला जात आहे.
-----------------------------------------------
कर्करोगाचे निदान झालेल्या लोकांना जीवनात बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळे सीएआरएफ संस्थेच्या माध्यमातून अशा रुग्णांना उपचार आणि दैनंदिन कामात मदत केली जात आहे.
- शमशी मुल्ला, अध्यक्ष, सीएआरएफ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90682 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top