गोवंडीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले
गोवंडीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले

गोवंडीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २९ (बातमीदार) : गोवंडीच्या बैगन वाडीमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी (ता. २९) एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. शकील खान (३४), रजिया खान (२५), सरफराज खान (७) व अतिसा खान (३) अशी चौघांची नावे आहेत. शकीलने तिघांना विष देऊन नंतर आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
सुपारीविक्रेता असलेला शकील त्याच्या भावासह हा व्यवसाय सांभाळतो. शकील रोज सकाळी १० वाजता दुकानात येतो. शुक्रवारी सकाळी साडेदहा झाले, तरी शकील दुकानात आला नसल्याने भावाने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. भावाने घरी जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा उघडण्यासाठी भावाला व वहिनीला आवाज दिला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह सापडले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवले. शकीलची पत्नी गरोदर असल्याचे समजते. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90691 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..