ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस
ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस

ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः ठाणे जिल्ह्यामध्ये २८ जुलैपर्यंत सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. खरिपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरू असून ५,३१० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील ११२ कृषी सेवा केंद्रांतून खतांची व १२० कृषी सेवा केंद्रांतून बियाण्यांची विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल भात बियाणे शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४२ गावांमध्ये शेतकऱ्यांनी घरचे नागली व भातबियाणे पेरणीसाठी वापरले आहे. त्यामुळे ३ टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविकखताची बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावात भातपिकाच्या रत्नागिरी ८ वाणाच्या प्रमाणित बियाण्याच्या भातपिकांचे पीक प्रात्यक्षिके ५८० हेक्टर क्षेत्रावर राबवण्यात येत आहे. २३२ क्विंटल बियाणे ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरू असून ५,३१० शेतकरी बांधवांना प्रशिक्षण दिले जात आहे, असे वाघ यांनी सांगितले.
................
तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहता ठाणे तालुक्यात ९७ टक्के, कल्याण ९६ टक्के, मुरबाड ९६.५० टक्के, भिवंडी १०६.६० टक्के, शहापूर १२६.७० टक्के, उल्हासनगर १२३.७० टक्के; तर अंबरनाथ तालुक्यात १५६.८० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत सुमारे १,६५३.५० मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या १०६.१० टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90696 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top