
लोकलमधील सराईत चोराला अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः लोकलमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजारांचे तब्बल १६ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अनिलकुमार वर्मा असे या चोराचे नाव आहे.
लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे खिशातील पाकीट, मोबाईल, दागिने यांवर आपला हात साफ करत असतात. लोकलमधून महागडे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनादेखील मोठ्या प्रमाणात घडतात. याच चोरट्यांच्या मागावर असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांना गस्तीवर असताना स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनिलकुमार याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीचा गुन्हा कबूल केला. अनिलकुमारकडे पोलिसांना १ लाख ८० हजार रुपयांचे तब्बल १६ मोबाईल आढळून आले आहेत. एका आठवड्याच्या कालावधीत त्याने १६ मोबाईलवर आपला हात साफ केला होता. अनिलकुमार हा मळूचा उत्तर प्रदेशचा असून त्याने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90699 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..