
मुंबईकरांच्या खिशाला कात्री?
मुंबई, ता. २९ : सीएनजीचे दर वाढल्यामुळे टॅक्सीचे किमान भाडे ३५ रुपये करण्याची मागणी करत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारपासून संपाची हाक दिली आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरण (एमएमआरटीए) ऑटोरिक्षा/टॅक्सीचे भाडेवाढीच्या प्रस्तावावर लवकर बैठक घेणार असून संप न करण्याची विनंती त्यांनी युनियनला केली आहे.
गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ३२ रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांना दररोज मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने शेवटची दरवाढ केल्यानंतर सीएनजीची किंमत ४८ वरून ८० रुपये प्रतिकिलो झाली आहेत. शासनाने टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी अनेकदा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून करण्यात आली आहे; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारपासून संपाची हाक दिली. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मुंबई टॅक्सीमेन्स युनियनला संप न करण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात पत्र सर्व ऑटोरिक्षा/टॅक्सी चालक संघटना पाठविण्यात आले आहे.
---
लवकरच बैठक
मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) पत्रात म्हटले, की ऑटोरिक्षा/टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात निवेदन आम्हाला प्राप्त झाले आहे. ऑटोरिक्षा टॅक्सी भाडेवाढ संदर्भातील प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या आगामी बैठकीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90728 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..