पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम, हार्बर मार्गावर
उद्या मेगाब्लॉक
पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३१) पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
-----
हार्बर रेल्वे
कुठे - सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर
कधी - सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम- ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल/वांद्रे/गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा रद्द राहील. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
---------------
ट्रान्सहार्बर
कुठे - ठाणे ते वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४. १० वाजेपर्यंत
परिणाम - या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द असतील, तर वाशी/नेरूळ/पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल रद्द असणार आहेत.
----
पश्चिम रेल्वे -
कुठे - बोरिवली ते गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा बोरिवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द असणार आहेत.
----

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90732 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..