मध्य रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट
मध्य रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट

मध्य रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट

sakal_logo
By

मध्य रेल्वेचे ‘ऑपरेशन अमानत’ सुसाट
अवघ्या सहा महिन्यांत दोन कोटींच्या वस्तू प्रवाशांना परत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) गेल्या सहा महिन्यांत ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत एक कोटी ८९ लाख किमतीचे सामान प्रवाशांना परत केले आहे. प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरलेले सामान, मोबाईल, लॅपटॉप, दागिने आणि रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तूंचा त्यात समावेश आहे.

सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत गरजू प्रवाशांना मदत केली आहे. रेल्वेस्थानकांत किंवा रेल्वे गाड्यांत प्रवाशांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल, लॅपटॉप, दागिने आणि रोख रक्कम प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून २०२२ दरम्यान, आरपीएफने ६८९ प्रवाशांच्या एक कोटी ८९ लाखांच्या वस्तू त्यांना परत केल्या आहेत. गेल्या वर्षी २०२१ मध्येही आरपीएफने ६६६ प्रवाशांचे एक कोटी ६५ लाख रुपयांचे सामान परत केले. त्यांपैकी ३८३ प्रवाशांचे एक कोटी एक लाख रुपयांचे साहित्य मुंबई विभागातूनच परत करण्यात आले आहे.

विभाग प्रवासी सामानाची किंमत
- मुंबई ३५४ १.१७ कोटी
- भुसावळ १४३ २८.१९ लाख
- नागपूर ८१ १९.१४ लाख
- पुणे ७३ १५.०४ लाख
- सोलापूर ३८ ९.३८ लाख

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90736 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..