व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान
व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान

व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान

sakal_logo
By

नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांना केवळ त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत, तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाची हानी होते. अमली पदार्थ समाजासाठी घातक आहेत. लहान मुले या व्यसनाच्या आहारी जाता कामा नयेत, यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक विजय सिंगे यांनी केले. सकाळ @९० प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम नेरूळ सेक्टर १ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्र. ११० मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अमली पदार्थविरोधी विषयावर बोलत होते.

‘सकाळ वृत्त समूहा’मार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत दरवर्षी अनेक विद्यार्थी सहभागी होतात. यामुळे मुलांच्या वाचन क्षमतेत भर पडते व दैनंदिन जीवनातील घटना माहीत पडतात, असे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे यांनी सांगितले. कृष्णा सुतार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सुतार यांच्या मदतीने या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला होता. या कार्यक्रमावेळी नीता गुंड, मनीषा जाधव, शिक्षिका शैलजा मोरे, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ @९० प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतल्यामुळे अनेक बातम्या वाचण्यास मिळाल्या. प्रश्न सोडवताना वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळाली.
- कुंती संजीवकुमार पासवाने, दहावी-ब

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90782 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..