ऐन श्रावणात उपवास महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन श्रावणात उपवास महागला
ऐन श्रावणात उपवास महागला

ऐन श्रावणात उपवास महागला

sakal_logo
By

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ३० : एकीकडे जीएसटी व इंधन दर वाढल्यामुळे किराणा, भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. उद्यापासून सुरू होत असलेल्या श्रावणी सोमवारी उपवास करणाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. फळांचे व उपवासाच्या जिन्नसांचे वाढलेले दर पाहता ऐन श्रावणात उपवास महागल्याचे चित्र आहे. उपवासासाठी लागणाऱ्या साबुदाणा, भगर, राजगिरा, शिंगाडा, रताळे, शेंगदाणे याचबरोबर फळांच्या दरातसुद्धा जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
श्रावणमासाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्‍यात केल्‍या जाणाऱ्या उपवासालाही मोठी परंपरा आहे. श्रावणात सप्‍ताहातील अनेक वारांना उपवास केले जातात. मात्र, यंदा हे उपवासच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.
आधीचे दर आणि आत्ताचे वाढलेले दर पाहिले, तर ही वाढ खूप जास्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना, उपवास करणेही आता डोईजड झाल्याचे काही नाराज नागरिक बोलत आहेत; तर वाढणाऱ्या दरांविषयी दुकानमालकानीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.


उपवास पदार्थांचे दर (किलो)
पदार्थ आधी आता
साबुदाणा ६० ७० ते १००
भगर १२० १४०
राजगिरा २२० २५०
शिंगाडा ३८० ४२० ते ४५०
शेंगदाणे १२० १२५ ते १३०
गूळ ६५ ८०
बटाटा वेफर्स २०० २४०
केळा वेफर्स ३०० ३४०


फळांचे दर

सफरचंद १७० २०० ते २४०
डाळिंब १३० १५० ते १६०
पेरू ९० ११० ते १२९०
नासपती १०० १२०
पेर १७० २००
मोसंबी १०० १२०
अननस ५० ८०

केळी ३० ते ४० ५०
वेलची केळी ५० ते ६० ७० ते ८०

जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. जसा जीएसटी वाढतोय, तसे वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे व्यवसाय करणेदेखील आता जिकिरीचे झाले आहे. आम्हालादेखील हे भाव परवडत नाहीत, तर ग्राहकांना होणारा अतिभार साहजिकच अधिक आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे.
- दीपाली दशरथ जाधव, परफेक्ट एंटरप्रायझेस


वर्षातून एकदा येणारा श्रावण म्हणजे पवित्र महिना. ९० टक्के हिंदू धर्मीय लोक या महिन्यात उपवास करतात. मात्र, उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचे व फळांचे दर इतके वाढले आहेत, की या वर्षी फक्त पाणी पिऊन उपवास करायचा की काय, अशी अवस्था झाली आहे. वाढत्या महागाईला आत्ताच आळा बसला नाही, तर शेजारील देश असलेल्या श्रीलंकेसारखी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होईल.
- प्रथमेश म्हसकर, सामान्य नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90790 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..