
मुंबई उपनगरांमधील आरोग्यसेवला बळकटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरात रुग्णालये वाढवण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. या अंतर्गत उपनगरात नवीन रुग्णालयांसोबत दोन हजार बेड्स उपलब्ध होणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुलुंड (अग्रवाल हॉस्पिटल), गोवंडी, भांडुप या पूर्व उपनगरांमध्ये; तर पश्चिम उपनगरामध्ये दहिसर, वांद्रे भाभा हॉस्पिटल, कांदिवली या ठिकाणी नवीन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत; तर नायर येथेही सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलची भर पडणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुमारे २ हजार बेड्सची अतिरिक्त संख्या मुंबईत उपलब्ध होईल. तसेच ज्या भागात हॉस्पिटलची सुविधा नव्हती किंवा क्षमतावाढ गरजेची आहे, अशा ठिकाणी हॉस्पिटल तसेच बेड्सच्या संख्येत भर घालण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईवरील भार कमी होणार
या हॉस्पिटलच्या संख्यावाढीसाठीच तीन हॉस्पिटलची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात उपनगरातील नागरिकांनाही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच मुंबईतील विविध हॉस्पिटलमध्ये होणारी गर्दी टाळता येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90798 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..