रेल्वेचा संघ पहिल्यांदाच गाठणार २३ हजार फूट उंची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेचा संघ पहिल्यांदाच गाठणार २३ हजार फूट उंची
रेल्वेचा संघ पहिल्यांदाच गाठणार २३ हजार फूट उंची

रेल्वेचा संघ पहिल्यांदाच गाठणार २३ हजार फूट उंची

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेचे संघ पहिल्यांदाच शिखर सर करणार असून ‘माऊंट नन एव्हरेस्ट’वर सात हजार १३५ मीटर म्हणजेच २३ हजार ४०९ फूट उंच चढाई करणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी शनिवारी ‘माऊंट नन पर्वतारोहण-२०२२’ला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात केली. सेंट्रल रेल्वे स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) मनोज शर्मा आणि सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबचे पथक या वेळी उपस्थित होते.

मध्य रेल्वेच्या ‘सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्टस् क्लब’ (सीआरएएससी) चे अभियांत्रिकी शाखेचे मुख्य कार्यालय अधीक्षक हेमंत जाधव आणि सेंट्रलाईज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे कार्यालय अधीक्षक संदीप मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली ‘माऊंट नन एव्हरेस्ट’ सर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२२ दरम्यान मोहीम फत्ते करण्यात येणार आहे. लडाख प्रदेशातील सूर खोऱ्यात वसलेले माऊंट नन अतिशय कठीण आणि थंड म्हणून ओळखले जाते. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून २३ हजार ४०९ फूट (७१३५ मीटर) आहे. त्याला प्री-एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखले जाते. पुढच्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे संघाचे ध्येय आहे. सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्टस् क्लब (सीआरएएससी) ने ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त हिमालयातील नन पर्वतावर चढाई करण्याची मोहीम आखली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

अनेक किल्ल्यांवर मोहिमा
‘सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्टस् क्लब’च्या पथकाने तरुण मनांना ट्रेकिंग आणि किल्ल्यांचे महत्त्व समजावे याकरिता आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर मोहिमा आयोजित केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. पथक आपत्ती झोनमध्ये मदत करणे, सायकलिंग मोहिमेचे नियोजन करणे आणि नागरिकांना सायकलिंगचे महत्त्व पटवून देण्यासारख्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये पथक गुंतलेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90818 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top