राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

sakal_logo
By

शिवडी, ता.३० (बातमीदार) : मुंबई आमच्या बापाची नाही कोणाच्या हक्काची, अशा घोषणा देत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या ''गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही'', या बेताल वक्तव्याच्या विरोधात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (ता.३०) हुतात्मा चौकात तीव्र निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले. मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90829 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..