मुंबईत मराठीचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत मराठीचा जागर
मुंबईत मराठीचा जागर

मुंबईत मराठीचा जागर

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० ः ‘मुंबई हा महाराष्ट्राचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही बजावणार!’ अशी घोषणा करत साहित्यिक- कलावंत, पत्रकार येत्या १ ऑगस्ट रोजी हुतात्मा चौकात सायंकाळी ५ वाजल्यापासून ‘मुंबई मराठी जागर’ करणार आहेत. ज्येष्ठ कवी- लेखक डॉ. महेश केळुसकर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत.
१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०२ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती आहे. या महापुरुषांच्या मराठी स्वाभिमान साहित्यातील उताऱ्याचे अभिवाचन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रेरक गीतांचे गायन करून १०६ हुतात्म्यांना ‘मुंबई मराठी जागर’तर्फे अभिवादन केले जाणार आहे. डॉ. महेश केळुसकर यांच्या फेसबुक पोस्ट आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘पानिपत’कार विश्वास पाटील, दलित पँथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे, नाटककार प्रेमानंद गज्वी, शाहीर संभाजी भगत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शाहीर मधू खामकर आदी अनेकांनी हुतात्मा चौकात हजर राहून मराठी जागर करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाचे फेसबुक व युट्यूब लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील गावोगावचे साहित्यिक, कलावंत, पत्रकार सामील होऊ शकतील, असे डॉ. केळुसकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90832 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..