
विरारमध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढला
नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : विरारमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा पुरलेला मृतदेह शनिवार (ता. ३०) बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. वडिलांनी हत्या करून मुलाचा मृतदेह झोपडीच्या बाजूला पुरला असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता. विरार पोलिसांना याची माहिती समजल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दुपारी ५ च्या सुमारास पुरलेला मुलाचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
निकेश वाघ असे मृत मुलाचे नाव आहे; तर गणेश वाघ (वय २५) असे वडिलांचे नाव आहे. विरार पूर्व जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी एका झोपडीत वाघ कुटुंबीय राहत आहे. मोलमजुरी व मंदिराजवळ भीक मागून आपली गुजराण करतात, अशी प्राथमिक माहिती आहे. २८ जुलै रोजी वडिलांनी झोपडीच्या बाजूलाच आपल्या मुलाची हत्या करून हा मृतदेह पुरला असल्याचा संशय स्थानिकांनी वर्तवला होता; मात्र मुलाच्या आजी-आजोबांनी मुलाचा आजारपणात मृत्यू झाला असल्याचा निर्वाळा दिला आहे.
कोट
मृतदेह संशयास्पद पुरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविला आहे. यात नरबळीसारखा कोणताही प्रकार नाही; पण ही हत्या आहे की आजाराने मृत्यू झाला आहे, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विरार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90844 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..