मिराभाईंदरमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिराभाईंदरमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
मिराभाईंदरमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

मिराभाईंदरमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मिरा भाईंदर शहर काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. भाईंदर पूर्व येथील नवघर नाक्यावर असलेल्या स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांचे वक्तव्य सामाजिक तेढ निर्माण करून दोन समाजात फूट पाडणारे आहे. त्यामुळे त्यांना माघारी बोलावण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. काँग्रेसच्या नगरसेविका रुबीना फिरोज, कार्याध्यक्ष राकेश राजपुरोहित, युवक काँग्रेस प्रदेश सचिव दीप काकडे, युवक अध्यक्ष सिद्धेश राणे, कुणाल काटकर, सेल अध्यक्ष सुशन शेट्टी, मुकुल त्यागी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90847 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..