जव्हारमध्येही शिवसेना बाळासाहेब गट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्येही शिवसेना बाळासाहेब गट
जव्हारमध्येही शिवसेना बाळासाहेब गट

जव्हारमध्येही शिवसेना बाळासाहेब गट

sakal_logo
By

जव्हार, ता. ३१ (बातमीदार) : राज्यात शिंदे गटाच्या रूपाने शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. त्यानंतर निष्ठावान शिवसैनिक आणि बंडखोर यांच्यात वाक्‌युद्ध रंगले होते; पण जव्हारमध्येही ‘शिवसेना बाळासाहेब’ गट स्थापन करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्तावावर आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांनी स्वाक्षरी केली आहे.
राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष आमचाच, असा दावा करणाऱ्या शिंदे गटाने शहरातील आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपल्या सोबत घेण्यासाठी मोर्चा वळविला आहे. त्यातच जव्हार नगर परिषदेच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह घेऊन थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल त्याचबरोबर उपनगराध्यक्षा पद्मा रजपूत यांच्यासह नगरसेवक संकेत माळगावी, संगीता अहिरे, स्वाती सोनवणे यांनी शिवसेना बाळासाहेब गट तयार केला असून या प्रस्ताव अर्जावर या पाचही लोकप्रतिनिधींनी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांच्या समक्ष स्वाक्षरी केली आहे. लवकरच त्याची पालघर जिल्हाधिकारी येथे नोंद करण्यात येणार आहे.
एकीकडे जव्हार तालुक्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक कार्यकर्त्यांनी आपले समर्थन दाखविले आहे, तर दुसरीकडे दुसरा गट तयार होत आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगले तापेल, असा अंदाजही जाणकारांनी वर्तवला आहे.

नगर परिषदेमधील पक्षनिहाय बलाबल
१. शिवसेना नगरसेवक ११ त्यापैकी ४ बाळासाहेब गटात
२. राष्ट्रवादी गटनेतासह नगरसेवक ७
३. भाजप नगरसेवक १

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90852 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..