रेल्वे स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम
रेल्वे स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम

रेल्वे स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठाणे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचे लागलेले ग्रहण आता रेल्वे स्वच्छतागृहापर्यंत पोहचले असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानकातील फलाट क्र. दोनवरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रूपांतर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आता पंचनामे करून कारवाई केली आहे. मात्र स्वच्छतागृहाचा ताबा फेरीवाल्यांनी घेतलाच कसा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज सहा लाख प्रवाशांची वर्दळ आहे; मात्र रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून परिसरात फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर फेरीवाल्यांना बसू न देण्याचे आदेश दिले असतानाही, ठाण्यात त्याची पायमल्ली केली जात आहे. रेल्वे प्रशासन व महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानक परिसरात ठाण मांडले आहे. या संदर्भात सातत्याने तक्रारी केल्यानंतरही जुजबी कारवाई केली जात असल्यामुळे फेरीवाल्यांच्या मुजोरीत वाढ झाली आहे. यात कहर म्हणजे आता या फेरीवाल्यांनी चक्क स्वच्छतागृहाचेच गोदाम केल्याचे समोर आले आहे.

रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहाच्या आवारात फेरीवाल्यांकडून माल ठेवला जात असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय वाघुले यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर फलाट क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागात फेरीवाल्यांनी वस्तू ठेवल्या असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी स्थानक व्यवस्थापक व रेल्वे पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी कंत्राटदार असलेल्या बुरा कॉन्ट्रॅक्टस् कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडेही चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मुख्य कंत्राटदाराची चौकशी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

चौकशीची मागणी
महापालिकेच्या कारवाईवेळी रेल्वे हद्दीत फेरीवाले येतात. महापालिकेचे वाहन गेल्यानंतर पुन्हा पथारी पसरत असल्याचे सर्रास आढळते. मात्र, आता रेल्वेच्या मालमत्तेचा वापर गोदाम म्हणून करण्यापर्यंत फेरीवाल्यांची मजल गेली आहे. या प्रकारात रेल्वेचे अधिकारी व कंत्राटदाराचा आशीर्वाद असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे, असे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90853 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..