राज्यपालांविरोधात वाशीत निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांविरोधात वाशीत निदर्शने
राज्यपालांविरोधात वाशीत निदर्शने

राज्यपालांविरोधात वाशीत निदर्शने

sakal_logo
By

तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) ः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने वाशी येथील शिवाजी महाराज चौकात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना नवी मुंबई शाखेच्या वतीने शनिवारी (ता. ३०) सायंकाळी ४ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निर्देशने करण्यात आली. जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा फक्त अपमानच केला नाही; तर गुजराती, मारवाडी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत अनेक राज्यांमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. मराठी माणसांनी कधीही त्यांना परकेपणाची वागणूक दिली नाही. राज्यपाल मात्र आता परराज्यांतील नागरिक आणि मराठी माणसांमध्ये दरी निर्माण करत असल्याचा, आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90860 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..