दहा लाखांची रोकड कारमधून लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा लाखांची रोकड कारमधून लंपास
दहा लाखांची रोकड कारमधून लंपास

दहा लाखांची रोकड कारमधून लंपास

sakal_logo
By

दहा लाखांची रोकड कारमधून लंपास
पनवेल, ता. ३१ (वार्ताहर) : नवीन पनवेल सेक्टर-१ मध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या कारच्या ड्रायव्हरच्या सीटखाली ठेवलेली १० लाखांची रोख रक्कम अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेलमधील पाले खुर्द येथे राहणारे दिलीप पाटील (४५) हे एका कंपनीत फ्लांट ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. त्यांना जमिनीच्या व्यवहारासाठी पैसे हवे असल्याने त्यांनी २६ जुलै रोजी दुपारी तळोजा एमआयडीसीतील बँक ऑफ इंडियामधून १० लाखांची रोख रक्कम काढलीही होती. ही रक्कम त्यांच्या कारमधील ड्रायव्हरच्या सीटखाली ठेवली होती. त्यानंतर नवीन पनवेल सेक्टर-१ मधील आयडीबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता पाटील यांनी नील हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर त्यांची कार उभी केली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दिलीप पाटील यांच्या कारची काच फोडून सीटखाली ठेवलेली १० लाखांची रोख रक्कम चोरली. हा प्रकार लक्षात येताच पाटील यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90861 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..