प्रशासकीय अनास्थेचे ‘श्वान’बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय अनास्थेचे ‘श्वान’बळी
प्रशासकीय अनास्थेचे ‘श्वान’बळी

प्रशासकीय अनास्थेचे ‘श्वान’बळी

sakal_logo
By

नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) ः वाशी, सेक्टर ८ मध्ये गाजावाजा करून महानगरपालिकेने उभारलेल्या डॉग पार्कची दुरवस्था झाली आहे. पाण्याचे निचरा होत नसल्यामुळे या पार्कला दलदलीचे स्वरूप आले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. पाळीव श्वानांना फेरफटका मारण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये नेले जात होते. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे महापालिकेने वाशी, सेक्टर ८ मध्ये शहरातील पहिल्या डॉग पार्कची उभारणी केली होती; परंतु या उद्यानाची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गवत वाढल्यामुळे पार्कमध्ये वावरणे कठीण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दलदल झाली असून पदपथावरील शेवाळामुळे चालणेही कठीण झाले आहे. तसेच उद्यानात झाडांच्या फांद्या व इतर कचरा साचला असल्याने उद्यानातील स्वछतेकडेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
----------------------
महापालिकेने डॉग पार्कची योग्य देखभाल दुरुस्ती करावी. या उद्यानाचा निश्चित उद्देशासाठी उपयोग होत नसेल, तर त्याचा नियमित उद्यानात रूपांतर करावे. या विषयाकडे महापालिका आयुक्तांना पत्रदेखील दिले आहे.
- किरण ढेबे, सामाजिक कार्यकर्ते

दिवसातून किमान दोन वेळा श्वानाला बाहेर फेरफटका मारण्यासाठी घेऊन जावे लागते. त्यासाठी महापालिकेचा डॉग पार्क उत्तम पर्याय आहे; परंतु काही दिवसांमध्ये या पार्कची दुरवस्था झाली आहे. गवत वाढल्यामुळे कुत्र्याला घेऊन जाणे धोकादायक वाटते.
- राहुल पाटील, जुहूगाव

सतत चालू असणाऱ्या पावसामुळे उद्यानात दलदल झाली आहे. त्यामुळे श्वान घेऊन जाण्यास त्रास होत आहे. डॉग पार्कमधील खेळण्यावरदेखील शेवाळे आले आहे.
- सायली पतरे, वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90864 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..