आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा - गोविंद बोडके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा - गोविंद बोडके
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा - गोविंद बोडके

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा - गोविंद बोडके

sakal_logo
By

मोखाडा, जव्हार, ता. १ (बातमीदार) : मोखाड्यात जुलै महिन्यात रस्त्याअभावी गरोदर मातेला मुसळधार पावसात डोली करून गावात आणल्याची घटना घडली होती. तसेच जव्हारमधील पाथर्डी ग्रामपंचायतीतील भाटीपाडा येथील घटनेचे वास्तव ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणले होते. त्याची दखल घेत पालघरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पदभार स्वीकारताच चारच दिवसांत या भागाची पायपीट करत पाहणी केली आहे. तसेच येथे रस्ता तयार करून येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात बोटोशी ग्रामपंचायतीमधील गावठाणात ४ जुलै रोजी प्रसूती कळा अनावर झाल्याने गरोदर मातेला गावात रुग्णवाहिका आणण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानतून रस्ता तयार केला होता; तर ७ जुलैला मरकटवाडी येथील आदिवासी गरोदर महिलेला भरपावसात प्लास्टिकमध्ये गुंडाळत डोली करून पायपीट करत दवाखान्यात दाखल करावे लागले. तसेच जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायतीमधील भाटीपाडा येथे रस्त्याअभावी आदिवासींचे हाल होत आहेत. या सर्व घटना ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणल्या होत्या. दरम्यान, पालघर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच गोविंद बोडके यांनी चारच दिवसांत या ठिकाणी शनिवारी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या वेळी त्यांनी लवकरात लवकर येथे रस्ता तयार करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
या वेळी बोटोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुकाराम पवार आणि त्र्यंबक मालक; तर भाटीपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ दरोडा यांनी या भागातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुशी सिंग, जव्हार, मोखाडा तहसीलदार सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.

कोट...

मरकटवाडीचा अर्धा रस्ता सार्वजनिक बांधकाम; तर उर्वरित जि. प. बांधकाम विभागाने मंजूर केला आहे; तर बोटोशी गावठाणात जाण्यासाठी नरेगा योजनेतून रस्ता तयार करण्यासाठी पाहणी केली आहे. त्यामुळे आदिवासींना रस्त्याची सोय होऊन ते मुख्य प्रवाहात येतील.
- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90866 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top