मूलभूत सुविधा नसल्याने मालमत्ता कर भरू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूलभूत सुविधा नसल्याने मालमत्ता कर भरू नये
मूलभूत सुविधा नसल्याने मालमत्ता कर भरू नये

मूलभूत सुविधा नसल्याने मालमत्ता कर भरू नये

sakal_logo
By

वसई, ता. २ (बातमीदार) : वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समितीच्या जी क्षेत्रातील शेकडो नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्याचबरोबर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने मालमत्ता कर का भरायचा, असा संताप प्रभाग समितीचे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी उपस्थित केला आहे. सुविधा नाही, तर नागरिकांनी कर भरू नये, असे थेट आवाहन करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

सध्या पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे; परंतु मूलभूत सुविधा देण्यात अपयश येत आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालेली असून त्यातून वाट काढताना वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागते. नायगाव पूर्वेतील पाणी समस्या बिकट झालेली असून पाणी टंचाईमुळे नागरिक तथा सोसायट्यांना चढ्या दराने खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. प्रस्तावित पाईपलाईनची कामेही रखडल्याने सर्वसामान्य जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. नळजोडणी कधी मिळणार, याची प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेच्या पाणीपट्टीसह टँकरकरिता पैसे पैसे मोजावे लागत आहेत. पाणी निचऱ्यासाठी गटारे उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांचा उद्‍भवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

करापोटी उत्पन्न अधिक मिळत असताना प्रभाग समिती जी मध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली; मात्र निष्फळ ठरत आहेत. पाणी व मूलभूत सुविधा मिळत नाही; तोपर्यंत करदात्यांनी मालमत्ता कर भरू नये.
- कन्हैया भोईर, माजी सभापती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90874 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top