पोयसर नाल्यात चिखल आणि घाणीचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोयसर नाल्यात चिखल आणि घाणीचे साम्राज्य
पोयसर नाल्यात चिखल आणि घाणीचे साम्राज्य

पोयसर नाल्यात चिखल आणि घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By

कांदिवली, ता. ३१ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला पोयसर हा प्रचंड लोकवस्ती असलेला विभाग आहे. या विभागातील गावदेवी मार्गाच्या खालून पोयसर नाला वाहतो. या नाल्यात चिखल गाळ, दगडी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
नालेसफाईला पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. नालेसफाई झाल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. मात्र या नाल्याची परिस्थिती पाहता नालेसफाई फक्त कागदावरच झाली का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. नाल्यात घाणीचे ढिगारे साचले आहेत. त्‍यातून पाणी वाहणे अवघड जात आहे. त्‍यामुळे पालिकेने तातडीने लक्ष घालून ही नालेसफाई करावी आणि स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्‍थानिकांकडून केली जात आहे.

नालेसफाई झाली आहे. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक पहाटे, दुपारी आणि रात्री कचरा नाल्यात फेकतात. याबाबत सूचना केल्या आहेत; तरीदेखील पाहणी करून योग्य कारवाई केली जाईल.
– समीर सानप, अभियंता आर/दक्षिण परिरक्षण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90915 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top