कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर हातोडा
कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर हातोडा

कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर हातोडा

sakal_logo
By

कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर हातोडा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः कोपरखैरणेतील बेकायदा बांधकामांवर अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने कारवाई केली. कोपरखैरणे सेक्टर १८ येथील चार घरांचे बांधकाम आणि सेक्टर १ ए येथील भूखंडावर उभारण्यात आलेल्या पावसाळी शेडवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान महापालिकेने संबंधितांकडून २० हजार रुपयांचे दंड वसूल केले.
कोपरखैरणे विभागांतर्गत कोपरखैरणे सेक्टर १८ येथील घर क्र. २३, २४, २५, २६ यांना महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(१) वापरत बदल केल्यामुळे २३ मे २०२२ ला नोटीस बजावली होती. महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतरीत्या बांधकाम चालू केले होते. तसेच कोपरखैरणे सेक्टर १ ए येथील भूखंड क्र. ४३ या ठिकाणी असलेल्या अनधिकृत पावसाळी शेडवर कारवाई करून हे शेड हटविण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बांधकामापोटीचा २० हजारांची दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली आहे. या दोन्ही अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत हातोडा चालवण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90927 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..