डहाणूत काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला
डहाणूत काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला

डहाणूत काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला

sakal_logo
By

डहाणू, ता. ३१ (बातमीदार) : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पालघर जिल्हा कमिटीने स्मृती इराणींच्या घरावर रविवारी मोर्चा काढला होता. डहाणू रेल्वेस्थानक पूर्व येथून हा निषेध मोर्चा आयोजित होता. स्मृती इराणीचे घर असलेल्या रामवाडी भागात भाजपचे नगराध्यक्ष भरत सिंग राजपूत, भाजप पदाधिकारी आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या वेळी पोलिसांनी काँग्रेसच्या निषेध मोर्चाला जागीच अडवून धरले. त्यामुळे हा मोर्चा स्मृती इराणीच्या घरापर्यंत पोहचू शकला नाही. काँग्रेसने काढलेल्या या निषेध मोर्चात महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, पालघर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रफुल्ल पाटील, मोईज शेख, बळवंत पाटील, कुलदीप वर्तक, रुफी भुरे, शरयू ओसरकर सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90929 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..