शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना जामीन
शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना जामीन

शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना जामीन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील शाखेतील महत्त्वाची कागदपत्रे व १५ हजारांच्या रोख रक्कमेच्या चोरी केल्याप्रकरणी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर व विभागप्रमुख श्याम चौघुले यांच्यावर विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विष्णूनगर पोलिसांनी दोघांना शनिवारी अटक केली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील शिवसेनेच्या शाखेमध्ये शुक्रवारी सायंकाळी काही कामानिमित्त डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, विभागप्रमुख श्याम चौघुले, कविता गावंड आणि किरण मोंडकर हे गेले होते. या वेळी शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे, युवा सेना अधिकारी पवन म्हात्रे उपस्थित होते. या वेळी शिवसेनेच्या दोन गटामुळे वादावादी झाली. परेश म्हात्रे यांनी रात्री विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन खामकर, चौघुले, गावंड आणि मोंडकर यांच्याविरोधात १५ हजार रुपयांची रोख रक्कम व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पहाटे खामकर व चौघुले यांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रविवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना १५ हजाारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90952 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..