शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचे निधन
शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी रविवारी दुपारी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. ठाणे येथील ज्ञानेश्वरनगर-डॉ. गंगाधर नगर या भागातून ते तीनदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. महापालिकेत त्यांनी शिवसेनेचे गटनेते, स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते. मूळचे ते मुरबाडचे रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ज्ञानेश्वरनगर भागात राहत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने संतोष वडवले यांनी शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सक्रिय सहभाग घेऊन पक्षासाठी काम केले. संतोष वडवले हे गरीब कुटुंबातून आले होते. अत्यंत साधे राहणीमान, साधे विचार आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा त्यांचा गुण होता. दरम्यान, पक्षासाठी त्यांनी अनेक आंदोलनेदेखील केली होती.
गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. वडवले यांच्या मृत्यूने स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90959 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top