
मुंबई -गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य
रोहा, ता. १ (बातमीदार) ः पावसाने तीन-चार दिवसांपासून दडी मारल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे खडी-माती आजूबाजूला पसरली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावर नागोठणे ते कोलाडदरम्यान धुळीचे लोटच्या उडताना दिसतात. याचा त्रास वाहनचालकांसह प्रवासी, पादचाऱ्यांना होत आहे.
एखादे वाहन भरधाव वेगाने गेल्यास, रस्त्यावर पडलेली खडी उडते आणि पादचाऱ्यांना लागून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. अतिवेगाने अथवा अवजड वाहनांमुळे धूळ जास्त उडते, त्यामुळे पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने व ठेकेदाराने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90978 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..